शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भामरे, पाटील कुटुंबीय विकासाचे शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:02 IST

भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबतच भाजपावरही निशाणा साधला

धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातून बंड करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा पत्रकाद्वारे भूमिका मांडत काँग्रेससोबतच भाजपावरही निशाणा साधला आहे. ‘कॉँग्रेस आणि भाजपा यांचा प्रचार म्हणजे कौटुंबीक हेव्यादाव्यांचा धोबीघाट असून विकासाचा मुद्दाच त्यांच्याकडे नाही’ अशी टीका त्यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी लोकसभा निवडणुकीचे कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील व भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्यावर टीका केली आहे.कै.चुडामण पाटील १६ वर्षे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनी या कालावधीत केवळ मोहाडीसाठी रेल्वे स्टेशन केले. तर त्यांचे पुत्र व माजी मंत्री रोहिदास पाटील हे राज्याच्या राजकारणात ३० वर्षे आमदार, मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी केवळ अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीसाठी तब्बल २५ वर्षे खर्ची घातली. तसेच शेतकऱ्यांशी निगडीत धुळे तालुका खरेदी-विक्री संघ, धुळे तालुका दूध उत्पादक संघ आर्थिक अडचणीत आणून ठेवल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे.तर भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे वडील कै.रामराव पाटील यांना १९८० व १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात एकही विकासाचे काम केले नाही. त्यांनी जिल्हा बॅँक, पांझराकान सहकारी साखर कारखाना यांची वाट लावली. तर त्यांचे पुत्र डॉ.सुभाष भामरे यांना अनेक पक्ष बदलून शिवसेनेत आल्यानंतर २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये अपघाताने मराठा जात व पंतप्रधान मोदींच्या पुण्याईमुळे ते विजयी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdhule-pcधुळेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019