शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणासाठी ह्यआधारह्ण बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 22:53 IST

धुळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केले.कोरोना ...

धुळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत केले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ४५ वर्षापुढील आणि ६० वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, काही नागरिकांकडे आधारकार्ड नाही. यामुळे त्यांना कोविड लसीकरणाचा लाभ मिळणार नाही. म्हणून यंत्रणेने यातून मार्ग काढावा, अशी सूचना सदस्यांनी केली. यावर ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्यांचे रेशनकार्डमध्ये नाव असल्यास लसीकरणाचा लाभ द्यावा, अशी सूचना सभापतींनी केली. मात्र आधारकार्डशिवाय लसीकरण करता येणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.धुळे तालुक्यातील अंगणवाड्यांना बेबीकेअर किटचे वाटप सध्या करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठस्तरावरून पंचायत समितीकडे किट प्राप्त णाल्या आहेत. नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतून शेतकऱ्यांना पाच एचपीचे कृषीपंप व ताडपत्रीचा लाभ देण्यात आल्याचे कृषी अधिकारी चौधरी यांनी सांगितले. तर दुरुस्तीसंदर्भातील आठ कामे निविदास्तरावर असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. त्वरीत कार्यादेश देण्याचे आदेश आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे