शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आस्थापनांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

सेवायोजन कार्यालये कायद्यान्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची ...

सेवायोजन कार्यालये कायद्यान्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विहीत नमुदा ईआर- १ मध्ये नियमित राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. जून २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे या कार्यालयाद्वारे सुरू असून, या सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच यूझर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येक विभागाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉग इन करीत आपली अचूक माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाइन पद्धतीने सादर करून कायद्याचे अनुपालन करीत सहकार्य करावे. प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशीलदेखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तत्काळ अद्ययावत करावा, असेही आवाहन सहायक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे.