शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांनी जामफळचे काम बंद पाडले, महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:37 IST

शिंदखेडा पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी : जिल्हाधिकाऱ्यांशीही केली चर्चा

धुळे : शेतकºयांचे भाग्य बदलणाºया जामफळ सुलवाडे कान्होली प्रकल्पाचे काम शेतकºयांनी बंद पाडले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्यानंतर देखील मोबदला मिळत नसल्याचा आरोप करीत मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. लागलीच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी नियंत्रण आणत शेतकºयांची समजूत काढली. आंदोलन करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या भेटीला घेवून आले. प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकºयांचा संताप कमी झाला. पोलीस निरीक्षक तिवारी यांची मध्यस्थी फलदायी ठरली.महत्वाकांक्षी अशा सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. या कामासाठी भूमिअधिग्रहणही शासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकांना भूमिअधिग्रहणात मोबदला मिळाल्याचे समोर येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला देखील मिळाला आहे. मात्र, सोनगीर, सोंडले शिवारात जामफळ धरणाचे काम सुरु असून त्यात सोनगीर व सोंडल्याचे शेतकºयांच्या सुमारे ५०० हेक्टर शेतजमिनी या पाण्याखाली जात आहेत. या बाधीत शेतकºयांना मोबदला मात्र मिळालेला नाही. त्यासाठी त्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून काही दिवसांपुर्वी आंदोलन देखील केले. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना शेतकºयांची आहे.मंगळवारी जामफळ धरणाचे काम सुरु असताना संतप्त शेतकरी घटनास्थळी गेले. त्यांनी कामबंद पाडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यासोबतच शेतकºयांनी महामार्ग रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकºयांची भावना समजून घेत त्यांना विश्वासात घेतले. काम सुरु द्या असे म्हणत आपण शेतीच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटू, असे सांगत त्यांनी त्यांचाच गाडीतून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून आले. तेथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हे प्रकरण शिरपूरचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलणे करुन दिले. येत्या पाच ते सहा दिवसात अहवाल पाठवून शेतकºयांच्या मोबदल्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आंदोलन करणाºया शेतकºयांना आश्वासीत करण्यात आले. यानंतरही प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा केदारेश्वर मोरे, अविनाश महाजन, रविंद्र माळी, भटू धनगर, लखन रुपनर, श्याम माळी, पराग देशमुख, दंगल धनगर आदींनी दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे