शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

लघुद्योग सुरू करण्याची परवानगी द्या लघुद्योग भारती : शासनाच्या करांमध्ये सवलत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

महाराष्ट्रात १४ एप्रिलपासून लाॅकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. अत्यावश्यक वस्तू, कृषी, औषधी आदी उद्योग सुरू ...

महाराष्ट्रात १४ एप्रिलपासून लाॅकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. अत्यावश्यक वस्तू, कृषी, औषधी आदी उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. वरील क्षेत्राशी संबंधित पुरवठा साखळी आणि इतर लघुद्योजकांनाही सवलत द्यावी. यासाठी योग्य ती परवानगी लघुद्योगांवर संबंधित विभागांनी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी लघुद्योग भारतीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र वैद्य, महासचिव भूषण मर्दे यांनी केली आहे.

दरम्यान, लघुद्योग भारतीच्या धुळे शाखेनेदेखील पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात म्हटले आहे की, एक वर्षापासून लघुद्योग संकटात असताना महाराष्ट्रातील जे उद्योग परदेशी निर्यात करतात त्यांना काम चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याच प्रकारे जे उद्योग राज्याच्या बाहेर पुरवठा करतात त्यांनाही सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास या उद्योगांसमोर आपला ग्राहक गमावण्याची भीती आहे. हा मुद्दा लक्षात घ्यावा. या ‘ब्रेक द चेन’च्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लघुद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने सुटसुटीत व पारदर्शी प्रक्रिया राबवल्यास लघुद्योग लवकर सुरू होऊ शकतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे. या काळात लघुद्योग आर्थिक संकटात आसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही कराच्या मागणीला मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी केली आहे. नेहमीप्रमाणे सरकारच्या लाॅकडाऊन निर्णयाला लघुद्योग भारती सहकार्य करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.