जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार- जिल्हाधिकारी संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:15+5:302021-04-08T04:36:15+5:30

पुढील खासगी संस्थांना फक्त सुटीच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी असेल व केंद्र सरकारच्या ...

All freight services will continue in the district - Collector Sanjay Yadav | जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार- जिल्हाधिकारी संजय यादव

जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार- जिल्हाधिकारी संजय यादव

पुढील खासगी संस्थांना फक्त सुटीच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी असेल व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करून न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना १० एप्रिलपासून १५ दिवसांची वैधता असलेला कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

सेबी आणि सेबीची नोंदणीकृत स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरी, क्लेअरिंग कॉर्पोरेशन आणि सेबीकडे नोंदणीकृत मध्यस्थ, रिझर्व्ह बँकेने प्राथमिक स्वरूपात पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत सहभागी, सर्व नॉन बँकिंग वित्तीय संस्था, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, वकिलांची कार्यालये, व्हॅक्सिन, जीवनावश्यक औषधी व फार्मास्युटिकल उत्पादनाशी संबंधित, अशी कस्टम हाऊस /मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट असोसिएशनची कार्यालये, रात्री ८ ते सकाळी ७ वाजेदरम्यान किंवा सुटीच्या दिवशी विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा परत घरापर्यंत प्रवास करणाऱ्या, जाणाऱ्या व्यक्तीस वैध तिकिटाच्या आधारे सूट देण्यात येईल. कारखान्यातील कर्मचाऱ्यांना खासगी बस, व्यक्तिगत वाहनाद्वारे ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेदरम्यान किंवा सुटीच्या दिवशी प्रवास करण्यास औद्योगिक आस्थापनेत कामावर हजर राहण्यास सूट देण्यात येईल. उपासनेची ठिकाणे पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. केवळ लग्नसमारंभ, अंत्यविधीसाठी सदर ठिकाणी सेवा देणाऱ्या व्यक्तींना आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सेवा देण्यासाठी सूट देण्यात येईल.

घरकामास मदतनीस, वाहनचालक, स्वयंपाकी यांना त्यांचे काम करण्यास रात्री ८ किंवा सुटीच्या दिवशी सूट देण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे.

Web Title: All freight services will continue in the district - Collector Sanjay Yadav