शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा पाणी योजनेच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:40 IST

वन विभागाची परवानगी : मोराने-नगावबारी पाईपलाईनचे काम सुरु

धुळे : मोराणे ते नगावबारीपर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामातील वनविभागाचा अडसर दूर झाला असून धुळे शहरासाठीच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली आहे. मोरोणे ते नगावबारी जलवाहिनीच्या मार्गात काही ठिकाणी वनविभागाची जमीन येत होती. वनविभागाच्या परवानगीसाठी काम रखडले होते. परंतु आता वनविभागाने परवानगी दिल्याने जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाली आहे.धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत अक्कलपाडा धरणाजवळ जलशुध्दीकरण केंद्राचे बांधकाम सुरू आहे. या केंद्राची शुध्दीकरण क्षमता ६९ एमएलडी आहे. आतापर्यंत त्याचे २५ टक्केपेक्षा अधिक काम झाले आहे. या जलशुध्दीकरण केंद्रावरून धुळे शहरातील जलकुंभांना थेट पाणीपुरवठा होणार आहे.अक्कलपाडा प्रकल्पापासून शहरातील हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ४० किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम ३० किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच मोरोणे गावापासून नगाव बायपासने नगावबारी जलकुंभापर्यंत १३ किलोमीटर जलवाहिनी टाकली जाणार आहे. अक्कलपाडा धरणातील पाणी तेथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाईल. पाणी उचलण्यासाठी धरणाच्या क्षेत्रात जॅकवेल आवश्यक आहे. परंतु धरणाची पाणी पातळी अधिक असल्याने विहीर खोदणे शक्य नाही. त्यामुळे काम थांबले आहे. धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर जॅकवेलचे काम सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. पाच दिवस पुरेल इतके पाणी साठवणे सामान्यांना शक्य होत नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी पाण्यासाठी वणवण होते. उन्हाळ्यात अधिकच हाल होतात. अक्कलपाडा योजनेचे काम पूर्ण झाल्यावर धुळेकरांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे