शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल कारकूनवर एसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:30 IST

शिरपूर : खासगी इसमही सापडला, एक फरार

धुळे : शेतजमिनीवर रहिवासी परवानगी मिळालेला आदेश नोंदवून थाळनेरचे तलाठी यांच्याकडे पाठविण्यासाठी लाच स्विकारणारा शिरपूर येथील अव्वल कारकून आणि खासगी इसम यांना ८ हजाराची लाच स्विकारताला पकडण्यात आले़ यातील अव्वल कारकून संशयित कैलास कंखरे पळून जाण्यात यशस्वी ठरला़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याधुळे येथील पथकाने ही कारवाई बुधवारी दुपारी केली़ शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तक्रारदार यांचा भाऊ महेंद्र  शिरसाठ यांच्या नावे असलेली थाळनेर शिवारातील वडिलोपार्जित शेत जमिनीवर रहिवासी प्रयोजनार्थ बिनशेती (एनए) परवानगी मिळालेला आदेश नोंदवून तलाठी थाळनेर यांच्याकडे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती़ यातील ८ हजार रुपये स्विकारण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून कैलास भिका कंखरे आणि खासगी इसम चंद्रसिंग भरतसिंग पवार (४५, रा़   बोराडी ता़ शिरपूर) हे दोघे गेले असता ८ हजार रुपयांची लाच स्विकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकला़ यावेळी पोलिसांच्या हाती चंद्रसिंग पवार सापडला़ मात्र, कैलास कंखरे पळून जाण्यात यशस्वी ठरला़ चंद्रसिंग पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस    अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग