शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मार्चअखेर ९८ टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

धुळे : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेचा सरासरी ९८.२६ टक्के निधी मार्चअखेर खर्च झाला ...

धुळे : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेचा सरासरी ९८.२६ टक्के निधी मार्चअखेर खर्च झाला आहे. उर्वरित निधीच्या खर्चाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२०२१ करिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यास १९० कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत ३०.०४ कोटी रुपये, तर अनुसूचित जमाती योजनेंतर्गत १०४.०१ कोटी रुपये असा एकूण रुपये ३२४.०५ कोटी निधी मंजूर होता. धुळे जिल्ह्यास मंजूर नियतव्ययापैकी सर्वसाधारण योजनेंतर्गत रुपये १८४.५३ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत रुपये १०३.९३ कोटी, अनुसूचित जमाती योजनेअंतर्गत रुपये २९.९८ कोटी एवढा निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला असून जिल्ह्याचा एकूण खर्च सरासरी ९८ टक्के झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीचे सर्व कामकाज आयपास या ऑनलाइन प्रणालीवर करणे सन २०२०-२१ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध यंत्रणांना या प्रणालीच्या वापराचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी प्रस्ताव वेळेत सादर करून निधी खर्च होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यातच धुळे जिल्ह्यात विधान परिषद निवडणूक, ग्रामपंचायतीच्या निवडणुका अशा दोन आचारसंहिता लागोपाठ लागल्या. याशिवाय कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुरुवातीला जिल्हा विकास योजनेच्या निधी खर्चावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर ८ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये शंभर टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्याबाबत सूचविण्यात आले होते.

या प्रणालीवर कार्यान्वयीन यंत्रणांनी किमान ७ दिवस अगोदर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करणे आवश्यक असते. जेणेकरून प्रस्तावाची छाननी करणे, त्यातील त्रुटी दूर करून प्रशासकीय मान्यता करणे व निधी वितरण करणे वेळेत शक्य होऊ शकते. मात्र, काही कार्यान्वयीन यंत्रणांकडून जिल्हा नियोजन समितीस शेवटच्या ३-५ दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांची छाननी करणे आणि नियमानुसार प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करणे शक्य व्हावे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे कार्यालयाने जादा वेळ कामकाज केले. या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत निधी वितरित करण्यात आलेल्या यंत्रणांपैकी काही यंत्रणांना तांत्रिक कारणामुळे निधी आहरीत करता आला नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही जिल्हा नियोजन अधिकारी हटकर यांनी म्हटले आहे.