शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाड्यात ७० टक्के जलसाठा अडविण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST

माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची मागणी धुळे निम्नपांझरा अक्कलपाडा धरणांत यंदाही ७० टक्के जलसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात ...

माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची मागणी

धुळे निम्नपांझरा अक्कलपाडा धरणांत यंदाही ७० टक्के जलसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ५० टक्के जलसाठा निर्माण झाल्यानंतर उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नकाणे, हरण्यामाळ, कोठरे, निमडाळे, गोंदूर तलाव तसेच या बंधाऱ्यांवर अवलंबून असणारे साठवण तलाव भरुन घेण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी जिल्हा प्रशासन व धुळे पाटबंधारे विभाग व मनपाकडे केली आहे.

अक्कलपाडा धरण हे धुळे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीवर अत्यंत उपयुक्त ठरत असून धरणांतील पाण्याचा धुळे शहरासह ग्रामीण भागातील सुमारे १०० खेड्यांना उपयोग होत आहे. साक्री, धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील गावांना या धरण्याचा पाण्याचा लाभ मिळत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अक्कलपाडा धरणावर दुष्काळी परिस्थितीची पूर्ण भिस्त अवलंबून आहे. अक्कलपाडा धरणांत अपेक्षित जलसाठा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व अक्कलपाडा धरणाशी संबंधित अपूर्ण कामांची आणि वाढीव भूसंपादन विषयांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या आहेत मागण्या

अक्कलपाडा धरणातील वाढीव बुडित क्षेत्रास भूसंपादन करुन शेतकऱ्यांना नवीन प्रचलित दराप्रमाणे पूर्ण मोबदला देण्यात यावा. जोपर्यंत पुर्ण मोबदला मिळत नाही तोवर ७० टक्के टक्केच जलसाठा निर्माण करणे शक्य होणार आहे, अक्कलपाडा धरणांत ५० टक्के जलसाठा निर्माण झाल्यानंतर उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नकाणे तलाव, हरण्यामाळ साठवण तलाव तसेच डाव्या कालव्याद्वारे खाऱ्या लघुप्रकल्प, निमडाळे, कोठारे लघुप्रकल्प, गोंदूर तलाव भरुन घेण्याचे व डावा कालवा वहन क्षमतेसाठी पूर्ण प्रवाही करण्याचे निश्चित करावे, धरणाच्या उगम क्षेत्रावर चांगला पाऊस झाल्यास अक्कलपाडा धरणातील पाण्याद्वारे उजव्या डाव्या कालव्यालगत येणारे लहान मोठे बांधारे पावसाळा संपण्यापूर्वी भरुन घेण्याचे नियोजन करावे, अक्कलपाडा धरणातील डाव्या कालव्यालगत अपुर्ण पोटचाऱ्यांचे काम पूर्ण करुन त्यासाठी लागणारा वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा, जीपीएस सॅटेलाईट पद्धतीने केलेल्या वाढीव बुडित क्षेत्राचे सर्वेक्षण ग्राह्य धरुन नवीन जमिनी संपादन करण्यासाठी पक्क्या खुणा निश्चित करुन मा.कार्यकारी संचालक,तापी पाटबंधारे मंडळ जळगांव यांच्याकडे सुधारीत वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने सादर करण्यात यावा. त्यासाठी नियामक मंडळाची मान्यता घ्यावी, अक्कलपाडा धरणा खालील संभाव्य १३०० हेक्टर शेती क्षेत्र जुन्या ब्रिटिशकालीन पांझरा फडपद्धतीवर अवलंबून आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने बांधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी व फडपद्धत पुनर्जीवित करण्यासाठी मा.कार्यकारी संचालक,तापी पाटबंधारे विभाग जळगांव यांच्या माध्यमातून मा.कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांनी फडपद्धत जिवंत करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी मूळ प्रकल्पाव्यतिरिक्त अतिरिक्त निधीची तरतूद करावी, अक्कलपाडा धरणाखालील उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या स्वतंत्र पाणी वाटप संस्था स्थापन करून त्यांना पाण्याची बचत व वितरणाचे प्रशिक्षण द्यावे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या पाणी वाटप संस्थांच्या कामाची माहिती करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहली आयोजित करण्यासाठी पाटबंधारे विभागास निर्देश द्यावेत. पांझरा नदीतील पावसाळ्याच्या पाण्यातून सोनवद मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने प्रकल्पीय अहवालाप्रमाणे भरणे क्रमप्राप्त आहे. परंतू चालू वर्षी पांझरा नदी प्रवाहीपणे वाहत नसल्याने अक्कलपाडा धरणातून पाण्याचे वितरण करुन सोनवद प्रकल्प भरुन घेण्यासाठी यंत्रनेला आदेश द्यावे अशी शरद पाटील यांनी केली आहे.