शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये ४२८ जणांना कोरोनाचा संसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:25 IST

मंगळवारी २५ अहवाल पाॅझिटिव्ह

धुळे : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील ५०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, या महिन्यात दररोज सरासरी १० ते २० रुग्ण आढळले आहेत. दिवाळीच्या आधी २७५, तर दिवाळीनंतर २५३ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ९४० इतकी झाली आहे. ऑक्टोबरअखेर रुग्णसंख्या १३ हजार ४१२ इतकी होती. दिवाळीनंतर राज्यात सर्वत्र रुग्णसंख्येत वाढ होत असताना जिल्ह्यात मात्र या काळात रुग्णांची संख्या वाढली नसल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र दिवाळीच्या काळात संक्रमण वाढल्याने बाधितांची संख्या वाढू शकते, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १५ डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञानी व्यक्त केला आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.६१० रुग्ण झाले बरे - नोव्हेंबर महिन्यात ६१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ऑक्टोबरअखेर १२ हजार ७५५ रुग्ण बरे झाले होते. नोव्हेंबरनंतर बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत १३ हजार ३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.पाच रुग्णांचा मृत्यू - नोव्हेंबर महिन्यात ५ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक १५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.. १५ सप्टेबरनंतर मृत्युसंख्येत घट झाली आहे. तसेच बाधितांची संख्याही घटली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.मंगळवारी २५ अहवाल पाॅझिटिव्हधुळे :  जिल्ह्यातील आणखी २५ अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ९६५ इतकी झाली आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९४ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात श्रीरंग कॉलनी १, साक्री रोड १ व अभियंता नगर देवपूर येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १७ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १३८ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह  आला. भाडणे साक्री कोविड सेंटर येथील १० पैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महानगरपालिका रॅपिड अँटिजन टेस्टमधील २७७ पैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात महिंदले १, चितोड रोड १, गल्ली क्रमांक तीन १, धुळे १ यांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ६ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला. खासगी प्रयोगशाळेतील ४३ पैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, सप्तशृंगी नगर धुळे १, जय शंकर कॉ. चाळीसगाव रोड १, मनमाड जीन चाळीसगाव रोड १, फॉरेस्ट कॉ. धुळे ३, अमोल नगर देवपूर १, आनंद नगर देवपूर १, बापू भंडारी गल्ली देवपूर  १, कुमार नगर साक्री रोड १, तिखी रोड मारुती मंदिराजवळ मोहाडी १, नागरे नगर साक्री १, दहीवेल ता. साक्री १ व  मांडळ ता. शिरपूर येथील २ पाॅझिटिव्ह आले.

टॅग्स :Dhuleधुळे