शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३० रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:15 IST

टाळ्याच्या गजरात दिला निरोप : धुळे शहरातील सर्वाधिक १७ रूग्णांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धुळे शहरातील १७ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, जिल्हा रुग्णालयातून पाच, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून चार तसेच दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातून दोन रुग्णांना निरोप देण्यात आला.धुळे शहरातील मोहम्मदीया नगर येथील तीन रुग्णांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. माणिक नगर येथील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन कर्मचारी, नूरानी मज्जीद , वडेल रोड परिसर, जयहिंद कॉलनी, मौर्या हौसिंग सोसायटी व ग्रीन कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनमुक्त झाला आहे.निरोप देतांना आमदार डॉ.फारुख शाह, अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ.निर्मलकुमार रवंदळे यांच्या आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.शिरपूर - येथील रोजी उपजिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी चार रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून व फळांची परडी देऊन, आरोग्य सुदृढ राहण्याच्या शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी. एन .वाघ ,नायब तहसीलदार अडारी, डॉ. कपिल पाटील, डॉ. योगेश अहिरे, डॉ. मोज्जम खान, डॉ. अमोल जैन, डॉ. महेंद्र साळुंखे, गावित, चित्ते, माळी, नांदगावकर, के.झेड.पगार , विनोद निकम, जवरास मावशी, भगवान बोरसे, विलास धाकड, प्रवीण पाटील, निलेश गवळी, गणेश बेंडवाल, अशोक बिरारी उपस्थित होते. शिरपुर उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत एकूण ३० रुग्ण कोरोना मुक्त झालेत.दोंडाईचा - मुंबई कनेक्शन असलेल्या एक महिला व एक पुरुषाला कोरोनाची लागण झालेल्या दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना टाळ्यांचा गजरात फुले उधळत निरोप देण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, जिल्हा नोडल अधिकारी विशाल पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिल नरोटे, डॉ. सचिन पारख, डॉ. प्रफुल दुग्गड, डॉ.भूषण मोरे, तालुका कोरोना सेंटरचे डॉ. हितेंद्र देशमुख, दोंडाईचा नगरपालिका आरोग्य विभागाचे जितेंद्र गिरासे, पालिका आरोग्य विभागाचे शरद महाजन, तालुका नोडल अधिकारी डॉ.भामरे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. संतोष लोले आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांनी रुग्णालयात सर्व सुविधा मिळल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे