१४७ वर्र्षे जुन्या टॉवर उद्यानाच्या सुशोभिकरणास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:34 AM2019-11-11T11:34:56+5:302019-11-11T11:35:34+5:30

महापालिका : देवपूर भागातील ग़ द़ माळी सोसायटीला अशुध्द पाणीपुरवठा

१४७ Speed up the beautification of the twin old tower park | १४७ वर्र्षे जुन्या टॉवर उद्यानाच्या सुशोभिकरणास गती

dhule

Next

धुळे : देवपूर भागात असलेल्या ग़द़ माळी सोसायटीत जलवाहिनी गटारीत असल्याने जलवाहिनीव्दारे नागरिकांना अशुध्द पाणीपुरठा केला जात आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व व जलवाहिनी लागलेल्या गळत्याद्वारे लाखो लीटर पाण्याची दररोज अक्षरश: नासाडी होते़ तर जलकुंभातून प्रभागासाठी पाणीपुरवठा करणारे बहूसंख्य जलवाहिनी व व्हॉल्व्ह लिकेज असल्याने प्रभागाील सांडपाणी लिकेजव्दारे जलवाहिनीत गेल्याने नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होतो़ त्यामुळे नागरिकाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ देवपूर भागात असलेल्या ग़द़ माळी सोसायटीत जलवाहिनीव्दारे अनेक प्रभागात पाणीपुरवठा केला जातो़ काही दिवसापासुन दुरूस्तीच्या कामासाठी गड्डा खोदण्यात आल्याने गटारीजवळच पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले़ त्यामुळे स्थानिकांकडून मनपाच्या कारोभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे़
नियोजनाचा अभाव
यंदा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने डेडरगाव, नकाणे तलावासह अन्य तलाव शंभर टक्के भरले आहेत़ त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे़ मात्र मनपाच्या नियोजनाअभावी शहराचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही़ सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला जलसाठा लक्षात घेता मनपाला बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येवू शकते़ मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी आजही नागरिकांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे़

Web Title: १४७ Speed up the beautification of the twin old tower park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे