शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात १४ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:48 IST

सुनील साळुंके शिरपूर : शासनाकडून मिळणारा अव्वाच्या सव्वा वेतनात आपला चरित्रार्थ सुरळीत चालू शकतो, तरीदेखील सामान्य जनतेच्या खिशातून पैसा ...

सुनील साळुंकेशिरपूर : शासनाकडून मिळणारा अव्वाच्या सव्वा वेतनात आपला चरित्रार्थ सुरळीत चालू शकतो, तरीदेखील सामान्य जनतेच्या खिशातून पैसा कसा ओढता येईल यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून लाखोची मालमत्ता झाल्यानंतरदेखील पैशांचा हव्यास सुटत नाही. शेवटी ‘अती तिथे माती’ होतेच. असेच लाचखोरीचे प्रकार गेल्या काही वर्षांत तालुक्यात घडले असून, या लाचखोरांना अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरपूर तालुक्यातील  सर्वाधिक कर्मचारी लालसेला बळी पडत असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवायांवरून दिसत आहे. आतापर्यंत १९ अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक अधिकारी राजू छगन पवार यांना बुधवारी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तत्पूर्वी गेल्या २२ डिसेंबर २०१९ रोजी ठेकेदारांकडून इलेक्ट्रिक कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी ७१ हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी सुदर्शन साळुंखे व सहायक अभियंता स्वप्नील माळी या दोघांना पथकाने अटक केली होती. उपजिल्हा रुग्णालयातील  सहायक अधीक्षक गोपाळ पीतांबर राणे व कनिष्ठ लिपिक गणेश श्याम माळवे यांना ६५ हजार रुपयांची लाच घेताना ४ सप्टेंबर २०१९ रोजी पकडले होते. या रुग्णालयातील ही पहिलीच घटना ठरली.अर्थे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाो अधीक्षक सुनील शिवाजी खराटे यांना ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी २६ मार्च २०१८ रोजी अटक झाली होती. जातोडे येथील तलाठी डी. ओ. इहावले हे शेतकऱ्याच्या उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी लाच घेताना ५ जुलै २०१७ रोजी जाळ्यात अडकले होते. सावेरचा ग्रामसेवक सावेर-गोदी येथील ग्रामसेवक राहुल रायसिंग यांना २१ जून २०१७ रोजी, तर २१ जून २०१७ रोजी शहरात दुकान निरीक्षक भारती पावरा व पंटर प्रमोद पाटील यांना पकडले होते.थाळनेर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक अधिकारी बी. बी. सोनवणे यांना २९ डिसेंबर २०१६ रोजी आणि शिरपूर पंचायत समितीच्या प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक प्रमोदगिरी सुभाषगिरी गोस्वामी यांना ३१ ऑगस्ट २०१६ रोजी पकडण्यात आले. पंचायत समितीतील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता आर. आर. पाटील यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी २०१५ पकडले होते.२० ऑक्टोबर २०१५ मध्ये येथील पंचायत समितीतील कृषी अधिकारी अभय नथू कोर यांनी कृषी दुकानाचा परवाना देण्यासाठी लाच मागितली होती.

टॅग्स :Dhuleधुळे