आरटीईच्या राखीव जागांसाठी १ हजार ८० अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:36+5:302021-03-17T04:36:36+5:30

मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव आहेत. या जागांवर ...

1,080 applications received for RTE reserved seats | आरटीईच्या राखीव जागांसाठी १ हजार ८० अर्ज प्राप्त

आरटीईच्या राखीव जागांसाठी १ हजार ८० अर्ज प्राप्त

मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांसह विधवा, परित्यक्ता महिलांचे अपत्य, एचआयव्हीबाधित, ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांग बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. या जागा भरण्यासाठी गेल्या महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १०४ शाळांची नोंदणी करण्यात आली. या शाळांमधील १ हजार १७१ जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली आहे. पालकांना ते राहात असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येईल. पण, पालकांना दुसऱ्या शाळेत प्रवेश हवा असेल तर तशी नोंद अर्जात करावी लागेल. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २१ मार्च आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातून ५६५ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यस्तरावरून सोडत निघेल. त्यानंतर प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

मदत कक्षात नागरिकांच्या समस्यांचे होणार निवारण

अशा आहेत जागा

जिल्ह्यातील १०४ शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक २९ शाळा साक्री तालुक्यातील आहेत. धुळे ग्रामीणमधील २५, शिंदखेडा तालुक्यात २३, शिरपूर तालुक्यात १६, धुळे महापालिका क्षेत्रात ११ शाळांमधील राखीव जागा भरण्यात येतील.

Web Title: 1,080 applications received for RTE reserved seats