धुळ्यात 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: April 20, 2017 17:37 IST2017-04-20T17:37:42+5:302017-04-20T17:37:42+5:30

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई : दोन जण ताब्यात

10 lakh 67 thousand gutka seized in Dhule | धुळ्यात 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त

धुळ्यात 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त

 धुळे, दि.20- शहरातील चाळीसगाव चौफुलीवर पोलिसांनी इंदूरहून पुणे व मुंबईकडे जाणा:या दोन लक्झरी बसमधून 10 लाख 67 हजार 400 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आह़े गुरूवारी मध्यरात्री चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई केली़ तसेच दोघा चालकांना ताब्यात घेण्यात आले आह़े 

धुळे शहराबाहेरून जाणा:या महामार्गावरील हॉटेल डी़डी़आऱसी समोर व चाळीसगाव चौफुलीवरून इंदूरहून मुंबई व पुणे येथे जाणा:या संजय ट्रॅव्हल्समधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली़ त्यानुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने गुरूवारी मध्यरात्री 1़15 ते 1़30 वाजेदरम्यान चाळीसगाव चौफुलीवर दोन लक्झरी बसेसला (एमपी 09 एफए 5667) व (एमपी 30 पी 9075) पकडल़े त्यांची तपासणी केली असता प्रवासी शिट खाली गुटख्यासाठा आढळून आला़ पोलिसांनी बसमधून (एमपी 09 एफए 5667) आऱएम़डी गुटख्याचे 12 बॉक्स, विमल गुटखा व वि- तंबाखू पाऊच असे एकुण 16 कारटून व दुस:या लक्झरी बसमधून (एमपी 30 पी 9075) एकुण 10 मोठे गठानमध्ये  पान मसाला व वि- 1 तंबाखू चे एकुण 64 कारटून तसेच मोठ विमल पाऊच,  वि-1 तंबाखू गुटखा असे एकुण 32 कारटून असा दोन्ही बसमधून एकुण 10 लाख 67 हजार 400 रूपये किंमतीचा गुटखा व  30 लाख रूपये किंमतीच्या बस जप्त केल्या आहेत़
तसेच बस चालक मुकेश रामस्वरूप सिसोदिया (रा गुन्नाखापुरा पोष्ट विषणोदा जि़ धौलपुर) व गुल महंमद जरदार खान (रा़ राजाखेडा जि़ धौलपुर) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत़ 

Web Title: 10 lakh 67 thousand gutka seized in Dhule