महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 07:09 IST2026-04-18T07:08:50+5:302026-04-18T07:09:36+5:30

Crime News: सोलापूर-धुळे महामार्गालगत शासकीय वनात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना, महिला गुत्तेदाराकडे ६ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Woman smuggler beaten with rods and sticks for extortion of Rs 6 lakh, case registered against 6 people | महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

- राजकुमार जाेंधळे

धाराशिव  - सोलापूर-धुळे महामार्गालगत शासकीय वनात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना, महिला गुत्तेदाराकडे ६ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पाेलिसांनी सांगितले, शोभा धोंडीराम जाधव (रा. परांडा) या महिला गुत्तेदार वनीकरण विभागात काम करत असताना, आरोपी राजू माने व पांडुरंग माने यांनी कामाच्या बदल्यात ६ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने शोभा जाधव यांना गंभीर मारहाण केली. यावेळी इतर चार साथीदारांनी जेसीबी ऑपरेटर मनोज धनवे यालाही मारहाण करून सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले.

याप्रकरणी शोभा जाधव यांनी वाशी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग माने, राजू माने, मारुती माने, नाना माने, सलमान पठाण व एका जेसीबी ऑपरेटरविरुद्ध (सर्व रा. भूम) खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनी सावंत व पोलीस हवालदार कपिल बोरकर करत आहेत.

Web Title : महिला ठेकेदार से रंगदारी के लिए मारपीट, छह लोगों पर मामला दर्ज।

Web Summary : एक महिला ठेकेदार को वृक्षारोपण कार्य के लिए 6 लाख रुपये की रंगदारी देने से इनकार करने पर बेरहमी से पीटा गया। धाराशिव में हमले के बाद छह लोगों पर हत्या के प्रयास और रंगदारी का मामला दर्ज किया गया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Woman contractor assaulted for extortion; case filed against six.

Web Summary : A female contractor was brutally attacked for refusing to pay ₹6 lakh extortion money demanded for tree plantation work. Six individuals have been booked for attempted murder and extortion following the assault in Dharashiv. Police are investigating.