संस्कृत दिनी विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:24+5:302021-08-23T04:34:24+5:30

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ग्रंथपुजन झाल्यानंतर निलेश कुलकर्णी यांनी स्तोत्रपठण केले. प्रास्ताविक प्रा. श्यामराव दहिटणकर यांनी केले. यानिमित्त ...

Various competitions on Sanskrit Day | संस्कृत दिनी विविध स्पर्धा

संस्कृत दिनी विविध स्पर्धा

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ग्रंथपुजन झाल्यानंतर निलेश कुलकर्णी यांनी स्तोत्रपठण केले. प्रास्ताविक प्रा. श्यामराव दहिटणकर यांनी केले. यानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत अहान व्यास, अर्जुन देशपांडे, कल्याणी वाकुरे, प्रियंका दरेकर, सत्यहरी वाघ, साहिल नवले, सार्थकी वाघ, अर्णव दहिटणकर तसेच पुण्याहून दूरदृष्य माध्यमामार्फत श्रीमद् भगवतगीता पठण अध्याय १५, सुभाषीते, भाषण, गीत गायन स्पर्धकांनी सादर केले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र संचालक डॉक्टरेट दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. रुपेश जावळे, कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी स्पर्धा परिक्षण केले. या संस्कृत दिनासाठी अविनाश ठोंगे, कुमार व्यास, गोविंद नवले, व्यास, सुनिता दहिटणकर उपस्थित होते. सुत्रसंचालन संस्कृत पंडित संदीपान यांनी केले तर आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले.

Web Title: Various competitions on Sanskrit Day