शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या लग्नाला उरले ८ दिवस; अक्षता पडण्यापूर्वीच वीज कोसळून बापाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:35 IST

लेकीच्या लग्नाची लगबग, पण विजांच्या कडकडाटाने होत्याचे नव्हते झाले; धाराशिवमधील कष्टकरी पित्याची प्राणज्योत मालवली.

- जोतिराम काटे

समुद्रवणी (जि. धाराशिव): ज्या कष्टकरी हातांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे कन्यादान करायचे होते, त्याच पित्यावर नियतीने काळाचा घाला घातला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडी शिवारात मंगळवारी सायंकाळी कडब्याची गंज झाकत असताना वीज कोसळून बबन गोविंद लांडगे (५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या आठ दिवसांवर आले असताना घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाईलवर गाणी सुरू होती अन् वीज पडलीमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परिसरात पावसाचे ढग दाटून आले होते. पावसापासून जनावरांचा चारा वाचवण्यासाठी बबन लांडगे हे कडब्याच्या गंजीवर ताडपत्री (तळवट) झाकत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईलवर गाणी सुरू होती. अचानक विजांचा कडकडाट होऊन थेट लांडगे यांच्यावर वीज कोसळली. विजेचा प्रहार इतका भीषण होता की, त्यांच्या खिशातील मोबाईलचे अक्षरशः तुकडे झाले.

लग्नाघरात पसरली शांततालांडगे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मुलीच्या लग्नाची खरेदी आणि निमंत्रणे वाटण्याचे काम उत्साहात सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला. बबन लांडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ज्या बापाने लेकीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, त्यांच्याच निधनाने लांडगे कुटुंबावर आभाळ फाटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father dies in lightning strike days before daughter's wedding.

Web Summary : Farmer Baban Landge died after being struck by lightning while covering haystacks. His daughter's wedding was just eight days away. The tragic incident has cast a pall of gloom over the village, leaving the family devastated.
टॅग्स :dharashivधाराशिवFarmerशेतकरीRainपाऊस