पेरणीलायक पाऊस नाही

By Admin | Updated: June 22, 2014 00:09 IST2014-06-21T23:56:41+5:302014-06-22T00:09:02+5:30

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली.

There is no rain incentive | पेरणीलायक पाऊस नाही

पेरणीलायक पाऊस नाही

तामलवाडी : मृग नक्षत्र संपले तरी तामलवाडी परिसरात अद्याप पेरणीलायक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच सोयाबीन व कांदा बियाणाचे भाव दुपटीने वाढले असून, सद्यस्थितीत शासनाकडून मिळणारे गारपिटीचे अनुदानच शेतकऱ्यांना खरिपातील पेरण्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे.
७ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु, अद्याप या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. यामुळे मशागतीची कामे करुन पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाचे वेळापत्रक बिघडत चालले आहे. त्यातच या हंगामात सोयाबीनच्या बियाणाची पिशवीचा भाव २६०० रुपये तर कांदा बियाणाच्या १ किलोचा भाव ३२०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे बियाणे हे घरगुती वापरावे असा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. (वार्ताहर)
बँक शाखेभोवती शेतकऱ्यांची गर्दी
तामलवाडी येथील जिल्हा बँक शाखेभोवती सध्या अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे. तासन् तास रांगा लावल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांअभावी वाटप संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळविण्यासठी किमान दोन दिवस लागतात. आणखीन किती दिवस हे वाटपाचे सत्र सुरु राहणार हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
टप्प्याटप्प्याने वाटप
सांगवी (काटी), वडगाव (काटी), सुरतगाव, जळकोटवाडी, पांगरधरवाडी या गावचे गारपीट अनुदान वाटप टप्प्याटप्प्याने सुरु आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शासनाने मंजूर केलेले अनुदान बियाणे खरेदीसाठी आधार ठरत असून, खासगी सावकाराचे उंबरठे झिजविणे काहीसे बंद झाले आहे.

Web Title: There is no rain incentive