शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी जबाब फाडल्याने तणाव

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कळंब तालुक्यातील उपळाई येथे बुधवारी हा प्रकार घडला.याबाबत माहिती अशी की, उपळाई येथे दोन रेशनदुकान असून, या दुकानदारांसंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावर २२ नोव्हेंबर २०१३ रोजी उपविभागीय अधिकारी सचिन बावरकर यांनी चौकशी करून रेशन दुकानदार दोषी आढळल्याने पर्यायी व्यवस्थाही केली होती. परंतु, यानंतर रेशन दुकानदारांनी या सर्व तक्रारी चुकीच्या असल्याचे सांगत आम्ही व्यवस्थित वितरण करतो, असे सांगून फेब्रुवारीपासून पुन्हा दुकान सुरू केले होते. दरम्यान, याबाबत पुन्हा उपळाई येथील २३७ ग्राहकांनी थेट राज्य शासनाच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. यावरून बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, नायब तहसीलदार शिवानंद बिडवे, एन. आर. काटे, मोहिते, वाघमारे, मंडल अधिकारी बी. ई. ओव्हाळ यांचे पथक चौकशी करून जबाब नोंदविण्यासाठी उपळाई गावात दाखल झाले होते. यावेळी पांडुरंग नागरगोजे या कार्डधारकाची चौकशी करून जबाब घेतल्यानंतर त्यांनी जबाब वाचून दाखवा, अन्यथा जबाब बदला, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावरूनच संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा घेतलेला जबाब फाडून टाकला. यामुळे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव शांत केला. दरम्यान, बुधवारी एकूण ८४ जणांचे जबाब घेण्यात आले. यापैकी ६८ जणांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)