सुरवसे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:50+5:302021-07-12T04:20:50+5:30

एकावर कारवाई कळंब : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ९ जुलै रोजी मार्केट यार्ड परिसरात छापा टाकला. यावेळी फेरोज ...

Selection of Suravase | सुरवसे यांची निवड

सुरवसे यांची निवड

एकावर कारवाई

कळंब : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ९ जुलै रोजी मार्केट यार्ड परिसरात छापा टाकला. यावेळी फेरोज सत्तार सय्यद हे जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून सय्यद यांच्या विरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

डिग्गी येथे छापा

उमरगा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ९ जुलै रोजी तालुक्यातील डिग्गी येथे छापा टाकला. यावेळी सुरेखा गहिनीनाथ चौधरी या १५ लीटर सिंधीसह मिळून आल्या. पथकाने हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

जुगार साहित्य जप्त

नळदुर्ग : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ९ जुलै रोजी शहरातील वर्धमान मेडिकलच्या बाजुुला छापा टाकला. यावेळी सतीश बाबुराव खंडेराव हे मटका जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला.

रस्त्याची दुरवस्था

उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक या दरम्यानच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यामुळे याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

Web Title: Selection of Suravase