१५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:13+5:302021-07-16T04:23:13+5:30

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत ...

The second dose of Covishield will be available at 15 centers | १५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा दुसरा डोस

१५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा दुसरा डोस

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण, तसेच शहरी भागात वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना सहा ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या १५ केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्डचा दुसरा डोस उपलब्ध असेल. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनीच दुसरा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: The second dose of Covishield will be available at 15 centers