संजय अंधारे यांचा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:54+5:302021-07-12T04:20:54+5:30

कळंब : बार्शी येथील डॉ. संजय आंधारे यांनी कोरोना महामारीमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्यांचा ...

Sanjay Andhare honored with the award | संजय अंधारे यांचा पुरस्काराने सन्मान

संजय अंधारे यांचा पुरस्काराने सन्मान

कळंब : बार्शी येथील डॉ. संजय आंधारे यांनी कोरोना महामारीमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. याबद्दल कळंब येथे आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कळंब शाखाध्यक्ष डॉ. कमलाकर गायकवाड, सचिव डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. अभिजीत लोंढे आदी उपस्थित होते. पहिल्या व दुसऱ्या लाटेत डॉ. अंधारे यांनी परिसरातील रुग्णांना विशेषतः गंभीर रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले.

110721\img-20210711-wa0049.jpg

बार्शी येथील डॉ संजय अंधारे यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांनी सन्मान केला. यावेळी डॉ कमलाकर गायकवाड, डॉ सत्यप्रेम वारे आदी

Web Title: Sanjay Andhare honored with the award