शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांच्या पानाला उशीर, पोलिसांनी बदड-बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : फुकटातील पान द्यायला उशीर झाल्याने निर्माण झालेल्या तंट्यात मध्यस्थी करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी जबर मारहाण केल्याची घटना उस्मानाबादेत ...

उस्मानाबाद : फुकटातील पान द्यायला उशीर झाल्याने निर्माण झालेल्या तंट्यात मध्यस्थी करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी जबर मारहाण केल्याची घटना उस्मानाबादेत घडली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह अन्य दोन पोलिसांवर आनंदनगर ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागात राहणारा फरीद इस्माईल शेख हा रिक्षा चालवतो. दोन दिवसांपूर्वी तो लातूर रोडवरील एका पानाच्या टपरीजवळ थांबला होता. तेव्हा आनंदनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, कर्मचारी मुक्रम पठाण हे त्या ठिकाणी आले. पठाण याने फरीद यास पान खाऊ घाल, असे सांगितले. मात्र, टपरी चालकाकडून पान देण्यास उशीर झाल्याने पठाण याने शिवीगाळ सुरू केली. फरीद याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पठाण याने त्यालाही शिवीगाळ करीत पोलीस वाहनात कोंबले. तेथून ठाण्यात आणून फरीदला निरीक्षक चव्हाण, कर्मचारी पठाण व अन्य एका कर्मचाऱ्याने सुंदरीने मारहाण केली. बुटाच्या लथाही घातल्या. यात फरीद जखमी झाल्यानंतर त्यास अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्याचवेळी फ्रीडचे भाऊ तेथे आले. त्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ केल्यानंतर पोलिसांनी फरीदला बाहेर काढले. याबाबत जखमी फरीदने ठाण्यात तक्रार केली असता ती नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्याने पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत चौकशी केली. फरीदच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या. यानंतर मंगळवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या फरीद शेख याचा जबाब नोंदवून घेत आनंदनगर पोलिसांनी निरीक्षक सतीश चव्हाण, मुक्रम पठाण व अन्य एका अनोळखी पोलिसांवर मारहाण, शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला आहे.