शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी : आश्वासक व बळ भरणारा, विरोधक : घोर निराशा पदरी टाकणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST

कृष्णासाठी ६६७ कोटी... जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये ६६७ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या ...

कृष्णासाठी ६६७ कोटी...

जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये ६६७ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयाचाही अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केल्याने त्यावरही मोहोर उमटली आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंतच्या कर्जाला आता ० टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न यामध्ये करण्यात आले आहेत. त्यासाठी गोदामाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी अखंडित वीज पुरवठा देण्यासाठीसुध्दा सरकारने पुढाकार घेतला आहे.

रेल्वे, वाटर ग्रीड, मदत कुठेय...

शिवसेनेचे तीन आमदार व एक खासदार असताना आजच्या अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारने तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नेमकं काय दिलं, याचा शोध घेणे अजून सुरु आहे. केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून असलेल्या राज्यातील योजना व प्रकल्पांचा मोठया प्रमाणावर उल्लेख आहे. कर्ज माफी पासून वंचित शेतकरी, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान, हक्काच्या पीकविम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेखही नाही.

मराठवाडा वॉटर ग्रीड, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग यांचाही उल्लेख झला नाही. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी गतवर्षी ८४० कोटींची तरतूद होती. तीही पुरेशी नव्हती. यंदा तर त्याहून कमी तरतूद झाल्याने या अर्थसंकल्पातून जिल्ह्याची घोर निराशा झाली आहे.

राज्याला बळ देणारा अर्थसंकल्प...

महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोना व टाळेबंदी संकटांवर मात करीत राज्याला बळ देणारा आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी देण्याचे धोरण आघाडी सरकारने घेतले आणि याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग, रोजगार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वाना पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी या दोन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेतला आणि इतर जिल्ह्यातील विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केल्याने तो सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरेल.

जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प...

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या विषयाला अर्थसंकल्पातून गती मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतुद करण्यात आली असून, पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी ऐतिहासिकच ठरला आहे. तीन लाखांपर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शून्य टक्के दराने कर्ज देण्याचा चांगला निर्णय झाला आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन भाजीपाला रोपवाटिका स्थापन होणार असल्याने विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातुन बाजार साखळी निर्माण करण्यात येणार आहे.