बकरी ईद निमित्तचे नमाज घरातूनच अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:56+5:302021-07-11T04:22:56+5:30
नळदुर्ग : मुस्लीम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना प्रतीकात्मक कुर्बानी करावी. तसेच बकरी ईदची नमाज घरीच अदा करून ...

बकरी ईद निमित्तचे नमाज घरातूनच अदा करा
नळदुर्ग : मुस्लीम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना प्रतीकात्मक कुर्बानी करावी. तसेच बकरी ईदची नमाज घरीच अदा करून कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी केले.
२१ जुलै रोजी होणाऱ्या बकरी ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक मुसा शहा, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक लक्षण कुंभार व ठाणे अंतर्गत गावातील पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे सतत मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी करू नका, सतत हात धुवा, असे सांगून राऊत म्हणाले, नागरिकांनी विविध सण व उत्सव साजरा करताना समाजात वाईट गोष्टी घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सण - उत्सवातून येणाऱ्या पिढीपुढे आदर्श निर्माण झाला पाहिजे.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण, नगरसेवक शहबाज काझी, धर्मगुरू मौलाना महमंद रजा आलीमसाब यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, मनसेचे ज्योतिबा येडगे, अलीम शेख, संदीप वैद्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबूब शेख, माजी उपनगराध्यक्ष शफी शेख, सरदारसिंग ठाकूर, खय्युम कुरेशी, खलील शेख, मुनीर शेख, रिजवान काझी, बशीर शेख, शहर काझी शोएब काझी, शब्बीर कुरेशी, अझर जहागिरदार, सतीश पिसे, विलास येडगे , शिवाजी नाईक, आयुब शेख, इरफान काझी आदी उपस्थित होते. बैठकीसाठी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी वाघमारे, हवलदार अच्युत पोतदार आदींनी परिश्रम घेतले.