पोलिसांनी बंद पाडला धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:55+5:302021-07-07T04:40:55+5:30

राज्यात शासनाने विविध निर्बंध लागू केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे; परंतु अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला ...

Police shut down a religious event | पोलिसांनी बंद पाडला धार्मिक कार्यक्रम

पोलिसांनी बंद पाडला धार्मिक कार्यक्रम

राज्यात शासनाने विविध निर्बंध लागू केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे; परंतु अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. शिवाय तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे हे नियम पाळणे गरजेचे आहे. असे असतानाही उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे गावापासून काही अंतरावर एका समाजाच्यावतीने धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यासाठी हजारो समाजबांधव येथे जमले होते. याची माहिती मिळाल्यानंतर ढोकी पोलिसांनी रात्री उशिरा त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम थांबविला.

दरम्यान, या कार्यक्रमास पोलिसांनीच मूकसंमती दिली होती; परंतु ही माहिती कळंब येथील काही पत्रकारांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा कार्यक्रम थांबविला असल्याची चर्चा आहे. शिवाय, या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाला आपण अगोदरच माहिती दिली होती; परंतु त्यांनी कारवाई केली नाही, असेही कसबे तडवळा येथील पोलीस पाटील यांनी सांगितले.

कोट......

वाघोली व गोपाळवाडीच्या मध्ये एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असून, या ठिकाणी गर्दी जमल्याची माहिती आम्हाला मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास समजली. यानंतर आम्ही कार्यक्रम स्थळी जावून हा कार्यक्रम बंद केला. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

- सुरेश बनसोडे, पोनि, ढोकी.

Web Title: Police shut down a religious event