स्वच्छता लघुपट निर्मिती स्पर्धेत सहभाग नाेंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:22+5:302021-07-14T04:37:22+5:30

उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील ‘‘स्वच्छता लघुपटांचा अमृत महाेत्सव’’ ही लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार ...

Participate in the cleanliness short film production competition | स्वच्छता लघुपट निर्मिती स्पर्धेत सहभाग नाेंदवा

स्वच्छता लघुपट निर्मिती स्पर्धेत सहभाग नाेंदवा

उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील ‘‘स्वच्छता लघुपटांचा अमृत महाेत्सव’’ ही लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार आहे. दाेन भागांत हाेणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शाैचालयाच्या नियमित वापरासाेबतच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या जनशक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा दाेन भागात हाेईल. पहिल्या भागात लघुपट निर्मिती आहे. यासाठी सहा विषय निश्चित केले आहेत. यात जैव-विघटनशील कचरा व्यवस्थापन, गाेबर्धन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय निश्चित केले आहेत, तर दुसऱ्या भागात वाळवंट क्षेत्र, डाेंगराळ प्रदेश, सागर किनारपट्टीलगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूर प्रवण क्षेत्र हे विषय स्पर्धकांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. विजेत्या स्पर्धकांना राेख स्वरूपात पारिताेषिके दिली जाणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी उपराेक्त विषयांवर लघुपट निर्मिती करून सक्रिय ई-मेल आयडीसह यु-ट्यूबवर अपलाेड करावेत. अपलाेड केलेली लिंक संकेतस्थळावर अथवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद येथे जमा करावी, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Web Title: Participate in the cleanliness short film production competition