‘माझा गाव...’ अभियानास खोंदला येथे प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:29+5:302021-02-08T04:28:29+5:30

कळंब : तालुक्यातील खोंदला येथे स्वच्छतेच्या माध्यमातून जनजागृती करत ‘माझा गाव, सुंदर गाव’ या अभियानाला ग्रामस्थांनी सुरुवात केली. ग्रामीण ...

‘My village ...’ campaign started at Khondla | ‘माझा गाव...’ अभियानास खोंदला येथे प्रारंभ

‘माझा गाव...’ अभियानास खोंदला येथे प्रारंभ

कळंब : तालुक्यातील खोंदला येथे स्वच्छतेच्या माध्यमातून जनजागृती करत ‘माझा गाव, सुंदर गाव’ या अभियानाला ग्रामस्थांनी सुरुवात केली.

ग्रामीण भागामध्ये घनकचरा, सांडपाणी, शौचालय या समस्या आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही यामध्ये १०० टक्के यश मिळाले नाही. यामागे लोकसहभागाचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. याच गोष्टीचा विचार करून लोक सहभागावर आधारित ‘माझा गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

तालुक्यातील खोंदला येथे या मोहिमेसाठी सुनिल मुळीक यांनी मोफत जेसीबी मशीन उपलब्ध करून दिली. यावेळी ग्रामपंचायत परिसर, मुख्य चौकासह नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक एच. जे. राऊत, बंडू मुळीक, निवृत्ती पवार, शीतलकुमार लांडगे, बालासाहेब लांडगे, नारायण लांडगे, बापूराव लांडगे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण लांडगे, अजिम सय्यद, आबासाहेब मुळीक, अभिजित मुळीक, अक्षय मुळीक, हनुमंत लांडगे, भागवत कदम, धनंजय लांडगे यांच्यासह जिल्हा परिषद आणि शरदचंद्रजी पवार शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा मदतनीस उपस्थित होते.

Web Title: ‘My village ...’ campaign started at Khondla