शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार - आमदारांचा कळंबमध्ये चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांचे कळंब शहरात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी ...

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांचे कळंब शहरात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्यासह शिवसैनिक एकवटत होते. यानंतर याठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. काही अवधीतच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनीही आंदोलनस्थळी येत आंदोलनात सहभाग नोंदवला. चौकात जवळपास दीड तास रस्ता रोखून धरत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. राजेनिंबाळकर, आ. पाटील यांच्यासह युवासेनेचे राज्य विस्तारक नितीन लांडगे, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, शहरप्रमुख प्रदीप मेटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, भागवत चोंदे, रूक्साना बागवान, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, लक्ष्मण हुलजूते, सुनील गायकवाड, हर्षद अंबुरे, अजित गुरव, भैय्यासाहेब खंडागळे, मंदार मुळीक, विशाल यादव, जनक कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, युवा सेनेचे विस्तारक नितीन लांडगे, सागर बाराते, प्रदीप मेटे आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज कळंब पोलीस ठाण्यात केला आहे.