व्यापारी, कर सल्लागारांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:46+5:302021-02-05T08:19:46+5:30

उस्मानाबाद : ‘आयकर व जीएसटी’तील जाचक अटींच्या विराेधात शुक्रवारी व्यापारी, कर सल्लागार तसेच उद्याेजगांच्या वतीने येथे आंदाेलन करण्यात आले. ...

Movement of traders, tax advisors | व्यापारी, कर सल्लागारांचे आंदाेलन

व्यापारी, कर सल्लागारांचे आंदाेलन

उस्मानाबाद : ‘आयकर व जीएसटी’तील जाचक अटींच्या विराेधात शुक्रवारी व्यापारी, कर सल्लागार तसेच उद्याेजगांच्या वतीने येथे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात सहभागी व्यक्तींच्या हाती असलेले सुधारणांविषयक फलक लक्ष वेधून घेत हाेते.

व्यापारी, उद्योजक हे व्यापारासोबत खरेदी-विक्री, वसुली, कर्ज, हिशोब, कर कायदे यांची पूर्तता ऑनलाइन करण्यासंदर्भात योग्य माहिती मिळत नाही. मागील पाच वर्षात कर कायद्याखालील अनेक तरतुदी जाचक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे विविध पूर्तता करताना दमछाक होते. सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती जीएसटी पोर्टलवरील तक्त्यानुसार दरमहा ठरावीक तारखेपूर्वी अपलोड करावी लागते. अंतिम तारीखेस सुट्टी असली तरी काम करावे लागते. त्यानुसार पोर्टलवर उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिट हिशोब पुस्तकाशी जुळते का? हे तपासावे लागले. आवक-जावक आणि उपलब्ध क्रेडिटनुसार रिटर्न आणि कर भरणा, कुठले क्रेडिट मिळाले व कुठले नाही याचा हिशोब ठेवून पडताळणी करावी लागते. कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटिलाइज्ड क्रेडिट अजूनही नक्की समजत नाही. यासह अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी हाेत असतानाही कुठल्याही सुधारणा हाेत नसल्याचे सांगत शुक्रवारी व्यापारी, कर सल्लागार तसेच उद्याेजकांच्या वतीने आंदाेलन करण्यात आले. बी.बी. ताम्हाणे, राधेश्याम तापडे, दत्तात्रय टोणगे, कर सल्लागार अजय नाईक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी मनाेगत व्यक्त केले. आंदाेलनात कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राहुल दुरुगकर, उपाध्यक्ष ॲड. रवींद्र कदम, सचिव दीपक भातभागे यांच्यासह पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. आंदाेलनात सहभागी पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलेले सुधारणाविषयक फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत हाेते.

Web Title: Movement of traders, tax advisors