कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ ३ जणांच्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:01+5:302021-02-07T04:30:01+5:30

उस्मानाबाद : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे, तर महिलांना कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी सात ...

Men fear family planning, only 3 surgeries last year | कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ ३ जणांच्या शस्त्रक्रिया

कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ ३ जणांच्या शस्त्रक्रिया

उस्मानाबाद : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे, तर महिलांना कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी सात दिवस रुग्णालयात राहावे लागते. असे असतानाही पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेबाबत उदासीनता असल्याने मागील पावणेदोन वर्षातील आकडेवारीवरून दिसून येत आहे. गत वर्षभरात केवळ ३ पुरुष शस्त्रक्रियेसाठी पुढे आले आहेत, तर ५ हजार ५१८ महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे.

जिल्ह्यातील गेल्या पावणेदोन वर्षातील कुटुंब नियोजनाची आकडेवारी बघितल्यास या कार्यक्रमास मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे महिलांच्या तुलनेत पुरुषांचा वाटा नगण्य आहे. गतवर्षी पुरषांचे प्रमाण ०.४३ टक्के इतके आहे. प्रत्येक गोष्टीत पुढे असणाऱ्या पुरुषांमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेबाबत असलेली उदासीनता दिसत आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी वेळखाऊ व त्रासदायक असली तरी ही जबाबदारी अनेक पुरुष महिलांवर सोपवीत असल्याचे समोर येत आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत असलेल्या विचारसरणी बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे झाले आहे.

पॉइंटर...

एक नजर... शस्त्रक्रियांवर

५५२१

वर्ष २०१९

५५१८

महिलांच्या झाल्या शस्त्रक्रिया

पुरुषांनी केली नसबंदी

२००२

वर्ष २०२०

२००२

महिलांच्या झाल्या शस्त्रक्रिया

०००

पुरुषांनी केली नसबंदी

काय आहेत गैरसमज

महिलांच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया सोयीस्कर आहे. मात्र, समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा व चालीरीतींमुळे पुरुषांमध्ये नसबंदीविषयी गैरसमज आहे. शस्त्रक्रियेनंतर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, वंध्यत्व, नपुंसकता येते अशी भीती आहे.

कोट...

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया महिलांपेक्षा अत्यंत सुरक्षित आहे. शस्त्रक्रियेनंतर भविष्यात शारीरिक व मानसिक अडचण उद्भवत नसते. शस्त्रक्रियेसाठी पुरुषांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्याबाबत जनजागृतीही केली जात आहे.

डॉ. हणुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

कुटुंब नियोजनाची केवळ महिलांची जबाबदारी नसून, पुरुषांची तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे पुरुषांनीही पुढे येऊन नसबंदी करणे गरजेचे आहे.

- सचिन क्षीरसागर

Web Title: Men fear family planning, only 3 surgeries last year