कलाध्यापक संघ महामंडळाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:18+5:302021-07-27T04:34:18+5:30

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या विभागातील आजी - माजी कलाध्यापकांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करून कार्यरत मृत कलाध्यापक कोरोना निधी देण्यासंदर्भात आश्वासित ...

Meeting of Arts Teachers Association | कलाध्यापक संघ महामंडळाची बैठक

कलाध्यापक संघ महामंडळाची बैठक

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या विभागातील आजी - माजी कलाध्यापकांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करून कार्यरत मृत कलाध्यापक कोरोना निधी देण्यासंदर्भात आश्वासित करण्यात आले. प्रास्ताविक अहवाल विभागीय उपाध्यक्ष विजयसिंह ठाकूर यांनी मांडला. प्रत्येक शाळेत कलाध्यापक नेमणूक, शासकीय रेखा परीक्षा गुणपत्रिका मूल्यांकन केंद्र जिल्हानिहाय अथवा पूर्वीप्रमाणे कला संचालनालय परिसर मुंबई येथेच व्हावे, यासाठी शासनदरबारी महामंडळाच्या वतीने निवेदन द्यावे, असा ठराव विभागीय सहकार्यवाह शेषनाथ वाघ यांनी मांडला. ए. एम. श्रेणी अडचणीसह आदी विषयांवरही यावेळी चर्चा झाली. उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीसाठी बैठकीचे आयोजन करावे, अशी सूचना राज्याध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली. राज्य उपाध्यक्ष दादा भगाटे, महिला राज्यप्रमुख प्रियवंदा तांबोटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. नांदेड जिल्हा सचिव गजानन गुंडाळे, लातूर जिल्हाध्यक्ष अशोक तोगरे यांनी जिल्हा उपक्रम वृत वाचन केले. बैठकीला राज्य सहसरचिटणीस हिरामण पाटील, लातूर जिल्हा सचिव पद्माकर वाघमारे आदी उपस्थित होते. राज्य कोषाध्यक्ष नरेंद्र बाराई यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of Arts Teachers Association