शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कळंबच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी एम. रमेश रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

कळंब : गत अनेक महिन्यांपासून ‘प्रभारीराज’ असलेल्या कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून एम. रमेश यांची नियुक्ती झाली असून, ...

कळंब : गत अनेक महिन्यांपासून ‘प्रभारीराज’ असलेल्या कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून एम. रमेश यांची नियुक्ती झाली असून, याठिकाणी प्रथमच आयपीएस सेवेतील अधिकारी कार्यरत राहणार आहेत.

कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत कळंब, वाशी, येरमाळा, शिराढोण व ढोकी ही पोलीस ठाणे व त्या अंतर्गतची गावे येतात. या ठिकाणचे नियमित उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील यांची माजलगाव येथे बदली झाली झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून प्रभारीराज होते. अखेर या पदावर एम. रमेश यांची नियुक्ती झाली आहे. नंदुरबार येथून त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

एम. रमेश हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून, त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून कळंब येथील रिक्त असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर ही नियुक्ती झाली आहे. कळंब येथे अशाप्रकारे झालेली ही पहिलीच पदस्थापना आहे.

तहसीलदारपदी शिंदे नियुक्त

दरम्यान, येथील तहसीलदार मंजुषा लटपटे या दीर्घ रजेवर होत्या. या दरम्यानच्या काळात प्रभारी तहसीलदार म्हणून नायब तहसीलदार अस्लम जमादार, प्रशिक्षणार्थी तहसीलदार रोहन शिंदे यांनी कामकाज पाहिले होते. अखेर लटपटे यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या या पदावर विद्या शिंदे यांची वर्णी लागली आहे. शिंदे या हिंगोली येथे सहायक पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.