क्रेडिट कार्डचे बिल कमी करण्याचे आमिष; पावणेदाेन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:28+5:302021-08-23T04:34:28+5:30

उस्मानाबाद : क्रेडिट कार्डचे बिल कमी करून देण्याचे आमिष दाखवून बावी (का.) येथील एका बॅंक ग्राहकाची सुमारे १ लाख ...

The lure of reducing credit card bills; Fraud of Rs | क्रेडिट कार्डचे बिल कमी करण्याचे आमिष; पावणेदाेन लाखांची फसवणूक

क्रेडिट कार्डचे बिल कमी करण्याचे आमिष; पावणेदाेन लाखांची फसवणूक

उस्मानाबाद : क्रेडिट कार्डचे बिल कमी करून देण्याचे आमिष दाखवून बावी (का.) येथील एका बॅंक ग्राहकाची सुमारे १ लाख ८२ हजार २६८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद शहर ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बावी (का.) येथील ग्रामस्थ दत्तात्रय सुखदेव मनसुके यांच्या भ्रमणध्वनीवर ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत एका अनाेळखी क्रमांकावरून वेळाेवेळी काॅल आले. ‘तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल कमी करून देताे’ असे आश्वासन देऊन संंबंधिताने मनसुके यांच्याकडून क्रेडिट कार्डची माहिती आणि क्रमांक घेऊन त्यांच्या भ्रमणध्वनीवरील आलेला लघुसंदेशातील गाेपनीय ओटीपी विचारला. यावर मनसुके यांनी सारासार विचार न करता आपली क्रेडिट कार्डविषयक माहिती व ओटीपी समाेरील व्यक्तीस सांगितला. सदरील माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीने मनसुके यांच्या क्रेडिट कार्डवरील १ लाख ८२ हजार २६८ रुपये एवढी रक्कम अन्यत्र वळविली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मनसुके यांनी २१ ऑगस्ट राेजी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

चाैकट...

खबरदारी घेण्याची गरज...

मागील काही दिवसांत ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा स्वरूपाचे अनाेळखी फाेन काॅल आल्यास नागरिकांनी गाेपनीय ओटीपी सांगू नये, असे पाेलीस प्रशासनाकडून वेळाेवेळी आवाहन केले जाते. असे असतानाही काही मंडळी आमिषाला बळी पडून सारासार विचार न करता गाेपनीय ओटीपी सांगताहेत. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. वाढत्या घटना लक्षात घेता, खबरदारी घेण्याची गरज पाेलिसांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Web Title: The lure of reducing credit card bills; Fraud of Rs