वारकऱ्यांचा तहसील कार्यालयावर लाॅंग मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:44+5:302021-07-13T04:07:44+5:30
परंडा : आगामी काळात कोरोनाचे सर्व नियम पाळून संतांचे सोहळे, आध्यात्मिक समारंभांना परवानगी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वारकरी ...

वारकऱ्यांचा तहसील कार्यालयावर लाॅंग मार्च
परंडा : आगामी काळात कोरोनाचे सर्व नियम पाळून संतांचे सोहळे, आध्यात्मिक समारंभांना परवानगी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वारकरी समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर साेमवारी लाॅंग मार्च काढण्यात आला. उपराेक्त मागणी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
शतकानुशतके पायी वारीची अखंड परंपरा खंडित करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या पूजेचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी काेराेना नियमांचे बंधन घालून आषाढी पायी वारीला परवानगी द्यायला हवी होती. दुसरीकडे मात्र, लग्न सोहळे इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे. सरकारच्या अशा धाेरणामुळे संतांचे सोहळे व सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. मंदिरे उघडण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने देव-देवता, संतांचे साेहळे तसेच आध्यात्मिक समारंभांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी साेमवारी परंडा तहसील कार्यालयावर लाॅंग मार्च काढण्यात आला. यानंतरही शासनाने मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. लाॅंग मार्चमध्ये ह. भ. प गणेश भोरे, ईश्वर महाराज ईटकर, बालाजी महाराज बोराडे, अमोल कुलकर्णी, भाग्यवान महाराज रोडगे, नानासाहेब महाराज रोडगे, शहाजी महाराज सुतार, संतोष महाराज गोडगे, सूरज महाराज रणभोर, नागेश महाराज मांजरे, पोपट महाराज सुतार, विनायक महाराज करडे, नीळकंठ महाराज पाटील, बाळासाहेब महाराज पाटील, कृष्णा महाराज चव्हाण, नवनाथ महाराज साठे, विनोद महाराज रोकडे, शहाजी चौधरी, पवन ढगे, मधुकर ढगे, गोपीनाथ महाराज बानगुडे, काकासाहेब गवारे, नागनाथ ढगे, धनाजी महाराज खांडेकर आदी सहभागी झाले हाेते.