कळंब - कळंब नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी घरोघर शुध्द पाणीपुरवठा करणाऱ्या मोबाईल व्हॅन क्रं. दोन, स्मशानभूमी अद्ययावत करणे, महिला व्यायामशाळा व उद्यानाच्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जीवनराव गाेरे यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, शहराध्यक्ष मुसद्दीक काझी, काँग्रेसचे भय्या निरफळ, सुरेश टेकाळे, रमेश देशमुख, नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, गटनेते लक्ष्मण कापसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, बांधकाम सभापती इंदुमती हौसलमल, विद्युत सभापती सुभाष पवार, नगरसेवक अमर गायकवाड, नगरसेविका साधना बागरेचा, गीता पुरी, कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर, जगन्नाथ बावळे, कौस्तुभ रोकमवार, सागर मुंडे, महेश पुरी, बाबूशेठ बागरेचा, बप्पा चोंदे, बालाजी स्वामी आदी उपस्थित होते.