मास्ककडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:38+5:302021-07-13T04:07:38+5:30
पिकांचा जीवदान वाशी : तालुक्यात जवळपास २३ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, पावसाने दडी मारल्याने ही ...

मास्ककडे दुर्लक्ष
पिकांचा जीवदान
वाशी : तालुक्यात जवळपास २३ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, पावसाने दडी मारल्याने ही पिके धोक्यात आली होती. मात्र, मागील चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे कोमेजून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.
वाहनधारक त्रस्त
जेवळी : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. यामुळे खड्डे चुकविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच्या दुरूस्तीची मागणी केली जात आहे.
अवैध धंदे वाढले
कळंब : तालुक्याच्या ग्रामीण भागात मटका, जुगार यासोबतच अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय देखील जोमात सुरू आहे. अनेक शाळकरी मुलेही याच्या आहारी जात असून, पोलीस प्रशासनाने कारवाई करून याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे