माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:42+5:302021-02-08T04:28:42+5:30
भूम : येथील रमाईनगर भागात माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेच पुष्पहार अर्पण करून ...

माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन
भूम : येथील रमाईनगर भागात माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ध्वजारोहणही पार पडले. कार्यक्रमास नगर परिषदेचे गटनेते संजय गाढवे, उपनगराध्यक्षा संयोगीता गाढवे, नगरसेविका सारिका थोरात, नगरसेवक किरण जाधव, सुनील थोरात यांच्यासह शाहीर चोखोबा कांबळे, पाटुळे, आश्विनकुमार कांबळे, बप्पा कांबळे आदी उपस्थित होते.
सावरगावात सामुदायिक बुद्ध वंदना
(फोटो : अजित चंदनशिवे ०७)
तुळजापूर : तालुक्यातील सावरगाव येथे पंचशील तरुण मंडळातर्फे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस माधवी हणुमंत फडके व काजल बालाजी फडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास डोलारे यांनी केले. हनुमंत फडके व सुरेश फडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सुनील फडके, हरिश्चंद्र फडके, त्रिंबक फडके, साईनाथ मस्के, गोरख डोलारे, शिवाजी फडके, विठ्ठल डोलारे, दामू सुरते, दत्ता फडके, रावसाहेब डोलारे, बाळासाहेब फडके, दासू फडके, सुभाष डोलारे, भीमराव फडके, विकास फडके, संजय फडके, शेखर फडके, रमेश डोलारे, सोमनाथ फडके, बापू डोलारे, सिद्राम फडके, जालिंदर फडके, नंदकुमार फडके, राजेंद्र डोलारे, बालाजी फडके, धर्मा फडके, दगडू फडके, बाळू डोलारे, रोहित मस्के, प्रमोद डोलारे, बबलू फडके, सुखदेव फडके आदी उपस्थित होते.
फक्त फोटो
(फोटो : अजित चंदनशिवे ०७)
तुळजापूर येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सागर कदम, जीवन कदम, लक्ष्मण कदम, कमलेश कदम, अनमोल शिंदे, शुभम कदम, शंभू ढाले, मुकेश साखरे, आदित्य कदम आदी उपस्थित होते.