गंगाबाई पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:01 IST2021-02-06T05:01:10+5:302021-02-06T05:01:10+5:30

सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाल्यानंतर शुक्रवारी कै. माधवराव पाटील यांच्या समाधी स्थळी दुपारी ...

Funeral on Gangabai Patil | गंगाबाई पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

गंगाबाई पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाल्यानंतर शुक्रवारी कै. माधवराव पाटील यांच्या समाधी स्थळी दुपारी ३ वाजता श्री शैलपीठाचे डॉ.श्री श्री श्री १००८ चन्नासिध्दाराम उमापंडित आराध्य शिवाचार्य महास्वामी व विविध मठाधिपती यांच्या हस्ते विधीवत पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूर मठाचे मठाधिपती बसवराज शास्त्री, होटगीचे मल्लीकार्जुन शिवाचार्य, मैंदर्गीचे निळकंठ शिवाचार्य, मंद्रुपचे रेणुका शिवाचार्य, नागणसुरचे श्रीकंठ शिवाचार्य, नंदगावचे राजशेखर महास्वामी, जेवळीचे गंगाधर स्वामी, नारळी मंठाचे जय मल्लीकार्जुन यांच्यासह या अंत्यविधीसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध स्तरातील हजारो नागरिक पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी झाले होते. याप्रसंगी जगद्गुरु शिवाचार्य महास्वामीजी यांनी कै. मातोश्री गंगाबाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून हजारो जनसागराच्या उपस्थितीत दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी शोकसभेला संबोधित करताना पाटील परिवाराच्या दुःखात जनसागर सहभागी झाला असून त्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना केली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आ.ज्ञानराज चौगुले, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.विक्रम काळे, शैलेश पाटील चाकूरकर, माजी आमदार वैजीनाथ शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, रवी पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, धीरज पाटील, किरण गायकवाड, एस.आर.देशमुख, नारायण लोखंडे, सुनील चव्हाण, संजय दुधगावकर, बाबा पाटील, औसाचे नगराध्यक्ष अफसर शेख, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, सुनील मिटकरी, प्रा.बी. व्ही.मोतीपवळे, व्यंकट बेंद्रे, अभय चालुक्य, दीपक जवळगे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Funeral on Gangabai Patil