शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पाच टन टोमॅटोचा वावरात ‘लाल चिखल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:30 IST

दर कोसळले; लाखभराचा खर्च वाया

- बालाजी अडसूळ कळंब (जि. उस्मानाबाद) : यंदाच्या वर्षी केळी, बटाट्याने शेतकऱ्यांना जेरीस आणलेच आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो पिकानेही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आवळली आहे. दर प्रचंड घसरल्याने अगदी काढणीसही न परवडणाऱ्या टोमॅटोचा वावरात पडून लाल चिखल होत आहे.  नफा अन् उत्पादन खर्च तर सोडा, काही तोड्यांचा काढणी खर्चही पदरी पडला नसल्याचे समोर आले आहे. वाकडी (केज) येथील परमेश्वर आण्णासाहेब कोल्हे, त्यांचे बंधू उत्रेश्वर, ज्ञानेश्वर यांनी एकरभर क्षेत्रात ६ हजार रोपांची लागवड केली होती. त्यांचा लाखावर खर्च वाया गेला. कथेतील शेतकरी व्यथा वास्तवात...वाकडी गावाशेजारच्या हसेगाव येथील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांनी चार दशकांपूर्वी, हतबल झालेल्या आबाने भरल्या बाजारात टोमॅटो पायदळी तुडवल्याचे विदारक चित्र आपल्या ‘लाल चिखल’ या गाजलेल्या कथेतून मांडले होते. याचीच पुनरावृत्ती वाकडीत झाली आहे. कोल्हे यांनी आपल्या रानात लगडलेल्या तोड्यातील जवळपास पाचेक हजार किलो माल शेतात काढून फेकला आहे. यामुळे साऱ्या वावरात लालगर्द टोमॅटोचा सडा पडला आहे.प्रारंभी माल कमी होता व भावही तसा खास नव्हता. पुढे वाढेल या आशेने खर्च सुरूच होता. मात्र, माल वाढत गेला तसा भाव कमी झाला. यामुळे शेवटी दहा-बारा मजुराकरवी काढलेला माल तोट्यात विकला. यातून काढणीचा खर्चही मिळणे कठीण झाले. यामुळे राहिलेल्या तीन, चार तोड्याचा माल पीक मोडत वावरात फेकला आहे.    - उत्रेश्वर कोल्हे, शेतकरी