नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:49+5:302021-08-25T04:37:49+5:30

नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील काटे चिंचोली येथील शेतकरी आबाजी मुरलीधर बिराजदार (वय ४२) यांच्याकडे आठ एकर ...

Farmer commits suicide due to barrenness and indebtedness | नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील काटे चिंचोली येथील शेतकरी आबाजी मुरलीधर बिराजदार (वय ४२) यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदर्निवाह चालत हाेता. शेती विकसित करण्यासाठी बँकेसह खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांपासून कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीचे उत्पन्न अनियमित होत होते. त्यातच गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाला आलेले पिके वाहून गेली. यामुळे शेतीतून कसलेच उत्पन्न मिळाले नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाकडूनही काही मदत मिळाली नाही. सततची नापिकी तसेच बँक, खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला. घेतलेले कर्ज फेडायचे कसे? ही विवंचनेतून आबाजी बिराजदार यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्यावर साेलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पार्थिवावर काटे चिंचाेली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide due to barrenness and indebtedness