शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास कामात व्यस्त रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST

भूम : प्रत्यकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सांडपाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवावे, असे आवाहन करून चोवीस तास कामात व्यस्त ...

भूम : प्रत्यकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सांडपाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवावे, असे आवाहन करून चोवीस तास कामात व्यस्त रहा, तरच जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले.

येथील शंभूराजे विचारमंचच्या वतीने आयोजित ‘स्मरण आक्काचं’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. आरोग्य सुधारण्यासाठी स्वच्छ पाणी पिण्याची गरज आहे. त्यामुळे गावकारभाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. आपण जेवण चांगले असावे, असा आग्रह धरतो. त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्यासाठीदेखील आग्रही राहिले पाहिजे. चांगले कर्म करा, स्वच्छता राखा, शौचालय बांधा, चांगले शिक्षण घ्या, अरोग्य जपा व आपल आयुष्य वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षस्थानी नगर परिषद गट नेते संजय गाढवे, तर उद्घाटक म्हणून परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे सीई होते. यावेळी शंभुराजे युवामंचच्या वतीने शहरातील व्यावसायिक अजित जाधव, महावीर साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गट नेते संजय गाढवे यांनी स्वच्छेतेबाबत नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे असल्याचे सांगून भूमकरांसाठी लवकरच सर्व सोईंनी युक्त रुग्णालय उभारण्यात येत असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. राम चंदनशिवे, प्रस्ताविक नागेश डोंगरे यांनी केले. अभार रणजित साळुंके यांनी मानले.