शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाचा भराव फोडून केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

जवळा (नि.) : परंडा तालुक्यातील मौजे राजुरी येथे शासनाने लाखो रुपये खर्च करुन तयार केलेल्या जमीन गट नं. १९० ...

जवळा (नि.) : परंडा तालुक्यातील मौजे राजुरी येथे शासनाने लाखो रुपये खर्च करुन तयार केलेल्या जमीन गट नं. १९० मधील पाझर तलावाचा भराव फोडून जमिनीला तारेचे कंपाऊंड करुन वहिताखाली घेऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, राजुरी येथील जमीन गट नंबर १९० मध्ये शासनाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरला पाणी वाढावे व त्या शिवारातील शेती ओलिताखाली यावी तसेच पाझर तलावाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च करुन पाझर तलाव बांधण्यात आला.

परंतु, काही शेतकऱ्यांनी हा पाझर तलाव ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने फोडून सपाट करुन सदर तलावाची शासनाची जमीन वहीत करुन घेतली. शिवाय, त्याला तारेचे कंपाऊंड करुन त्यात वास्तव्य करत अतिक्रमण केले आहे. सदर पाझर तलाव फोडलेला असल्यामुळे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास पाझर तलावाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाऊन शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जीवित हानी सुध्दा होऊ शकते. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.

यावर रामदास जगदाळे,प्रदीप गंभीरे, भागवत गंभीरे, सूरज गंभीरे, भास्‍कर गंभीरे, धिरज गंभीरे, संदीप कांबळे, तुळशीराम कांबळे, शिवाजी कांबळे, वसंत गंभीरे, बाळासाहेब गंभीरे, सचिन गंभीरे, संभाजी गंभीरे, सतीश लटके, संतोष लटके, नवनाथ लटके, रमेश लटके, शरद लटके, जयदेव लटके, बापू लटके, सतीश गंभीरे, विष्णू जगदाळे, दीपक जगदाळे, दशरथ जगदाळे, महानंदा जगदाळे यांच्या सह्या आहेत.

कोट...........

आमच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी निवेदन व परंडा तहसीलदारांकडून कार्यवाहीस्तव पत्र प्राप्त झाले आहे. तसेच अतिक्रमण केले असल्याचे देखील समजले आहे. परंतु, मी शासकीय कामासाठी औरंगाबादला आल्याने तिकडे जाऊ शकलो नाही. १९ जून रोजी राजुरीतील फोडलेल्या पाझर तलावाचा पंचनामा करणार असून, पाझर तलावाचा भराव फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला कळवणार आहे.

- प्रभाकर महामुनी, जलसंधारण अधिकारी, परांडा