२३ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:16+5:302021-09-21T04:36:16+5:30

साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही, शिवाय ...

Dosage of Covishield at 23 centers | २३ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस

२३ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस

साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही, शिवाय येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी मुरूम, सास्तूर, लोहारा, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब, उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, पोलीस हॉस्पिटल, उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, विठ्ठल मंदिर जुनी सराफ लाईन, परंडा येथील सिद्वीवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील भारतमाता मंदिर, वाशी येथील शिवशक्तीनगरमधील जि.प. पा. शाळा, भूम येथील रवींद्र हायस्कूल, मुरुम येथील नूतन प्राथमिक शाळा या केंद्रांवर कोविशिल्डची लस मिळेल. १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल.

Web Title: Dosage of Covishield at 23 centers