१५ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिनचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:58+5:302021-07-12T04:20:58+5:30

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत ...

Dosage of covacin will be available at 15 centers | १५ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिनचा डोस

१५ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिनचा डोस

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण, तसेच शहरी भागात वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना सहा ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस दिली जाणार आहे. या १२ केंद्रावर ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना प्राधान्य असणार आहे. जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, पोलीस रुग्णालय या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटांस लस घेता येईल. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Dosage of covacin will be available at 15 centers