कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाउनलोड करू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:22+5:302021-07-27T04:34:22+5:30
उस्मानाबाद : कमी टक्क्यात कर्ज मिळवा. कोणतेही व्याज न भरता घ्या कर्ज यासह इतर येणाऱ्या मेसेजद्वारे आपली फसवणूक होण्याची ...

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाउनलोड करू नका !
उस्मानाबाद : कमी टक्क्यात कर्ज मिळवा. कोणतेही व्याज न भरता घ्या कर्ज यासह इतर येणाऱ्या मेसेजद्वारे आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अशा मेसेज, ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
मोठ्या शहरांमध्ये अशा फसव्या मेसेजेसमुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामाने उस्मानाबाद जिल्ह्यात यासंदर्भात गत दीड वर्षात एकही गुन्हा दाखल नसला तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून सावधानता बाळगणे गरजेची आहे. अशा मेसेजेस, ॲप शक्यतोवर डाउनलोड न करणे, प्रतिसाद न देणे उत्तमच. काहीही शंका असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस, सायबर सेलकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बँक खाते साप करणाऱ्या ॲप डाउनलोडिंगपासून सावध
१ कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला की अनेकजण या मोहात पडून नवनवीन ॲप डाउनलोड करुन स्वत:ची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. असे ॲप डाउनलोड करु नयेत.
२ एखाद्यावेळी ॲप डाउनलोड झाल्यास त्यावर येत असलेल्या सूचनांना न वाचता न समजता संमती देऊ नये, यामधून मोठी फसवणूक होऊ शकते.
३ शक्यतोवर माहिती नसलेले, अनोळखी ॲप डाउनलोड करण्यापासून दूरच राहणे बरे, जमा केलेली पुंजी काही क्षणात रिकामी होऊ शकते. यासाठी नागरिकांनीच स्वत:हून खबरदारी घेणे गरजेचे आहे.
या आमिषापासून सावधान
अभिनंदन..अभिनंदन आपणास १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले... अशा मेसेजपासून सावध रहा.
सहज कमवा लाख रुपये महिना असेही काही मेसेज मोबाइलवर येतात. त्यापासून सावध रहा.
शून्य टक्के व्याजावर ताबडतोब लोन उपलब्ध असे काही मेसेज आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नका. या मेसेजद्वारे अनेकांची फसवणूक झाली असल्याची उदाहरणे आहेत.
गत दीड वर्षात एकाचीही फसवणूक नाही
उस्मानाबाद जिल्हा सायबर सेलकडून सायबर गुन्ह्यांवर करडी नजर ठेवली जात असून, वेळोवेळी कॉलेज, शासकीय कार्यालयांसह, विविध ठिकाणी सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. ऑगस्ट २०२० पासून अद्यापपर्यंत सायबर सेलकडे गुन्हे नगण्य आहेत. ॲप डाउनलोड झाल्याने फसवणूक झाल्याचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
ही घ्या काळजी...
१. एखाद्यावेळी एखादा ॲप डाउनलोड केल्यास मागितली जाणारी माहिती देऊ नका.
२. कोणतीही शंका असल्यास फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच ताबडतोब सायबर सेलशी संपर्क साधा.
३. तत्काळ कर्ज देणारे अनेक मेसेज मोबाईलवर येतात. या मेसेजेसना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष करा.