शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तय बाजार लिलाव प्रकरणात मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

कळंब -कळंब नगर पालिकेमध्ये तय बाजार जागा लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली असून याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर फौजदारी ...

कळंब -कळंब नगर पालिकेमध्ये तय बाजार जागा लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली असून याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याची मागणी येथील ॲड. मंगेश अष्टेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना खुलासा देण्याबाबत फर्मावले आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया नियमानुसार झाली असून यात काहीच तथ्य नसल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी स्पष्ट केले.

कळंब पालिकेने जुलै २० मध्ये तय बाजार गुत्ते संदर्भात जाहीर लिलाव ठेवला होता. न.प. च्या कर वसुली विभागामार्फत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. वास्तविक पाहता पालिकेस कोणताही जाहीर लिलाव, ई-लिलाव वा ई-निविदा काढावयाची असेल तर ठरावाद्वारे मान्यता घेऊनच प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे. ही निविदा जाहीर करताना कोणत्याही सभेची मान्यता न घेता मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी स्वतःच्या अधिकारात जाहिरात काढली. हा प्रकार सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाचा भंग करणारा आहे. तसेच पालिका हितास बाधा पोहोचविणारा आहे.

त्यामुळे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मनमानीपणे जाहीर लिलाव केला आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी ॲड. अष्टेकर यांनी तक्रारीत केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी कळंब पालिका मुख्याधिकारी यांना पत्र देऊन याप्रकरणी मुद्देनिहाय खुलासा अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारीत तथ्य नाही, हा दबावतंत्राचा भाग -नगराध्यक्षा मुंडे

तय बाजार लिलावाबाबत सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊनच जाहीरात दिलेली आहे. सर्वसाधारण सभेत ठराव होऊन संबंधित विभागाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांनी शहनीशा करून फाईल माझ्याकडे पाठवल्या. त्यानंतरच मान्यता देऊन जाहिरात दिलेली आहे.

तक्रारदार हे यापूर्वी नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या बनावट सह्या करून पालिकेची मालमत्ता हडपण्याच्या प्रयत्नात होते. म्हणून त्यांच्याविरुद्ध कळंब न्यायालयात प्रकरण चालू आहे. ते प्रकरण कमकुवत करण्यासाठी सहाय्य करावे म्हणून ते माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत आहे. संबंधित तक्रार देखील त्याचाच भाग आहे. त्या तक्रारीबाबत मुख्याधिकारी खुलासा सादर करतील. मात्र खोट्या तक्रारी देणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासंदर्भात आम्ही ठोस पाऊले उचलणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिली.