शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवच्या 'मसाल्याचा' सातासमुद्रापार डंका! वाशीच्या लेकीने जागतिक बाजारपेठ केली काबीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:14 IST

अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत धाराशिवच्या मसाल्याच्या चवीची जादू; , दररोज ७०० किलो मसालेची उत्पादन क्षमता, वार्षिक उलाढाल ३५ लाखांवर

- बाळासाहेब मानेधाराशिव : जिद्द आणि कष्टाच्या जोरावर धाराशिवच्या गीता भांडवले यांनी जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून त्यांनी १० प्रकारचे मसाले उत्पादित करून अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरियापर्यंत पोहोचवले आहेत. नऊ अत्याधुनिक मशिनरींद्वारे दररोज ७०० किलो उत्पादनाची क्षमता त्यांनी निर्माण केली आहे. चोख व्यवस्थापन, गुणवत्ता आणि आकर्षक पॅकिंगमुळे त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५ लाख रुपयांवर पोहोचली असून, ग्रामीण महिलांसमोर त्यांनी नवा आदर्श ठेवला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत असंघटित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक साहाय्य देणारी केंद्रपुरस्कृत योजना आहे. या योजनेत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांना १० लाखापर्यंतच्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान मिळते. याच योजनेचा लाभ घेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील गीता भांडवले या महिलेने जागतिक बाजारपेठही काबीज केली आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी उत्पादित केलेले १० प्रकारचे मसाले आज धाराशिव, बीड, सोलापूर जिल्ह्यांसह अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या विकसित देशांतील स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचले आहेत. गुणवत्ता आणि वेळेत पुरवठा ही या व्यवसायाची सूत्रे आहेत. मागणी नोंदवल्यानंतर काही दिवसांतच आकर्षक पॅकिंगमध्ये माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. या चोख व्यवस्थापनामुळे आज या उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५ लाख रुपयांच्या घरात गेली आहे. एका बाजूला शेतीतील संकटांमुळे हतबलता व्यक्त केली जात असताना, गीता भांडवले यांनी कृषीपूरक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन नवे मॉडेल उभे केले आहे.

योजनेतून उभारले उद्योगाचे साम्राज्यसुरुवातीला लहान स्तरावर काम करणाऱ्या गीता भांडवले यांनी शासनाच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत आर्थिक पाठबळ मिळवले. आज त्यांच्याकडे ९ अत्याधुनिक मशिनरी असून, त्याद्वारे दररोज ७०० किलो मसाला उत्पादन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांच्या या उद्योगात केवळ कुटुंबातील सदस्यच नाही, तर स्थानिक मजुरांनाही हक्काचा रोजगार मिळाला आहे.

जागतिक प्रदर्शनाने बदलले नशीब२०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अन्न उद्योग प्रदर्शनात गीता भांडवले यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या मसाल्यांची अस्सल चव आणि गुणवत्ता पाहून परदेशी ग्राहक भारावून गेले. या प्रदर्शनामुळे त्यांना अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरिया येथून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, परदेशातील नागरिक आता स्वतःहून संपर्क साधून मसाल्यांची मागणी करत आहेत.

बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्नकेवळ उत्पादन करणे महत्त्वाचे नाही, तर त्याला योग्य मार्केटिंग आणि जागतिक बाजारपेठेची जोड देणे गरजेचे आहे. जागतिक अन्न उद्योग प्रदर्शनातून मिळालेली जागतिक बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - गीता भांडवले, महिला उद्योजक.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv's spices impress globally, woman entrepreneur conquers international market.

Web Summary : Geeta Bhandvale from Dharashiv achieved global success by exporting spices to America, Germany, and South Korea. Utilizing government schemes and modern machinery, her business boasts a ₹35 lakh annual turnover, inspiring rural women.
टॅग्स :dharashivधाराशिवMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीfoodअन्न